महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 22, 2020
11:07AM

ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवा दात्यास शिक्षा करण्याची वीज ग्राहक अधिकार नियमात तरतूद

आकाशवाणी
सरकार ग्राहकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवा दात्यास शिक्षा केली जाईल, असं केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांनी म्हटलं आहे. वीज ग्राहकांचे अधिकार निर्धारित करणाऱ्या नियमांची घोषणा मंत्री सिंह यांनी काल केली, त्यावेळी ते बोलत होते.

नव्या नियमांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य ग्राहकांना शक्तीशाली बनवत आहे. आपल्या अधिकारांची आणि अधिकारांच्या अंमलबजावणीची सर्वांना माहिती असली पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.

ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन प्रथमच कायदे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना सेवा देतांना निर्धारित वेळेची मर्यादा ओलांडल्यास सेवादात्यास दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचं ऊर्जा मंत्री सिंह यांनी सांगितलं.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1