महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Dec 13, 2020
12:23PM

इस्राएल – भूतान राजनैतिक संबंधांवर सहमती

आकाशवाणी

इस्राएलनं भूतानसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. असे संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इस्राएल आणि भूतान दरम्यान अनेक वर्षांपासून गुप्त संपर्क केला जात होता, त्याची परिणती आता या करारामध्ये झाली आहे.

उभय देशांच्या भारतातील राजदूतांच्या दरम्यान, काल या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. या दोन्ही देशांनी जल व्यवस्थापन, कृषी, आरोग्यनिगा आणि अन्य क्षेत्रांमध्ये संयुक्त कार्य योजना तयार करण्यास मान्यता दिली आहे.

इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भूतान देशासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याचं स्वागत, एका ट्विटद्वारे केलं आहे. भूतान देशाने आजवर केवळ ५३ देशांसोबत असे संपूर्ण राजनैतिक संबंध, स्थापित केले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1