महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Mar 30, 2020
7:23PM

हजारो एकरावरचा ऊस गाळपाशिवाय पडून राहण्याची भिती

आकाशवाणी
कोरोनाचा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातले उसतोड मजूर परतीच्या मार्गावर आहेत. ऊस तोडणीची व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे यंदाचा गळीत हंगाम आठवडाभरात बंद करण्याचा निर्णय साखर कारखाना चालकांनी घेतला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात २ हजार एकरातला ऊस, गाळपाशिवाय शिल्लक राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ऊस तोड लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्व कारखाना चालक हे प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोना विषाणूच्या भीतीने उसतोड मजूर गावाकडे परतू लागले आहेत. काही मजूर तर आठ दिवसांपूर्वीच आहे त्या स्थितीत काम सोडून गावी निघून गेले आहेत. त्यामुळे अद्याप तोडणी न झालेल्या ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सांगली जिल्ह्यातील दत्त इंडिया, राजारामबापू, हुतात्मा किसन अहिर हे कारखाने अद्याप सुरू आहेत. मात्र मजूर कमी झाल्यामुळे ऊस गाळपाचं काम आटोपतं घ्यावं लागणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1