महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 23, 2020
2:05PM

भारतातल्या महिला आव्हानं स्वीकारत समाजात सकारात्मकता पसरवत आहेत

आकाशवाणी

देशाची भव्यता आणि विविधता प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब असून प्रेरणास्रोतही आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या ६२ व्या भागात बोलत होते.

नवी दिल्लीत हूनरहट प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर देशाची संस्कृती, परंपरा, खाद्य संस्कृती, संगीत, वस्त्र, हस्तशिल्प या क्षेत्रातल्या विविधतेचं दर्शन झाल्याचं त्यांनी म्हटलं. ही विविधता टिकवून ठेवणा-या कारागिरांच्या कथा प्रेरणादायी आहेत, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या तीन वर्षांपासून होणा-या या प्रदर्शनामुळे कलाकारांचं जीवन बदलून गेलं आहे.


या प्रदर्शनाच्या माध्यमातून अशा कलाकारांशी संवाद साधायला मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘जो देश फिट आहे, तो नेहमीच हिट राहणार’ तेव्हा देशाच्या भौगोलिक विविधतेमुळे लोकांनी आपल्या जीवनाला धाडसाची, साहसाची जोड द्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. वयाच्या बाराव्या वर्षी दक्षिण अमेरिकेतल्या सर्वात उंच शिखरावर चढाई करणा-या काम्या कार्तिकेयनं जे यश मिळवलं त्याबद्दल सर्वांनाच तिचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं.

देशातल्या मुलांमधे आणि युवकांमधे विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी सातत्यानं आवड वाढत आहे. चांद्रयान दोनच्या प्रक्षेपणावेळी आलेला अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. मुलांची उत्सुकता तसंच जिज्ञासा उल्लेखनीय असून, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी इस्रोच्या अभ्यागत कक्षाच्या सुविधेचा फायदा घेत शाळांच्या सहली आयोजित कराव्यात, असं आग्रही मत त्यांनी मांडलं.


इस्रोनं सुरु केलेला युवा विज्ञानी अर्थात, युविका कार्यक्रम प्रशंसनीय असून सरकारच्या जय जवान, जय किसान आणि जय संशोधन या उद्दिष्टांशी समन्वय साधणारा असल्याचं त्यांनी सांगितलं.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1