महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 06, 2020
8:42PM

जालनामध्ये वसंतदादा साखर संस्थेला ५१ एकर जमीन

आकाशवाणी
वसंतदादा साखर संस्थेला जालना जिल्ह्यात ५१ एकर जमीन वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ऊस शेती संशोधनात अग्रेसर असलेल्या या संस्थेचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आहे.

मराठवाडा आणि विदर्भातल्या ऊस शेतीविषयक संशोधनाला चालना देण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्याचं यासंदर्भातल्या असल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. ही जमीन कोणत्याही व्यावसायिक हेतूसाठी वापरता येणार नाही या अटीवरच वितरीत केली असल्याचंही टोपे यांनी म्हटलं आहे.

संस्थेचं जालना इथलं केंद्र शेतकऱ्यांना बीयाणांचं वितरण करेल तसंच ऊसाच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यासाठीही प्रयत्न करेल अशी माहितीही टोपे यांनी दिली आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1