महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 01, 2020
1:26PM

कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपकांची निर्मिती करणार

आकाशवाणी

इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कमी खर्चातल्या उपग्रह प्रक्षेपकांची निर्मितीसाठी तयारी करत असल्याची घोषणा इस्रोचे उपसंचालक हरिदास टी.व्ही. यांनी केली आहे. ते काल थिरुअनंतपुरम इथं झालेल्या एज टू थाऊसंड ट्वेंटी या अंतराळविषयक परिषदेत बोलत होते.

अशा प्रकारच्या एका प्रक्षेपकासाठीचा निर्मिती खर्च ३० ते ३५ कोटी रुपयांपर्यंत असेल, असं त्यांनी सांगितलं. या प्रक्षेपकाद्वारे ५०० किलो वजनापर्यंतचा उपग्रह अंतराळात नेता येऊ शकेल असं हरिदास यांनी सांगितलं.

यामुळे इस्रो अंतराळ व्यवसाय क्षेत्रात छोट्या ते मध्यम स्वरुपाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सक्षम होऊ शकेल, आणि त्यातूनच इस्रोला या व्यवसाय क्षेत्रात पाय रोवण्याची मोठी संधी निर्माण होईल, असं हरिदास यावेळी म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1