महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 17, 2020
10:51PM

भारताच्या जी सॅट-30 या उच्च क्षमतेच्या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

आकाशवाणी

भारतानं उच्च क्षमतेचा जी-सॅट-30 हा दळणवळण उपग्रह आज  फ्रेंच गयाना इथून अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे. 

हा उपग्रह दळणवळण, दूरचित्रवाणी आणि प्रसारण क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा पुरवेल. 3 हजार 357 किलो वजनाचा हा उपग्रह 12-सी, आणि 12 KU बँड ट्रांसपाँडरनी युक्त असून तो इनसॅट-4-ए ची जागा घेईल. भारतामधे KU बँडनं, तर आखाती देशात सी बँडनं सेवा पुरवणारा जी सॅट-30 हा उपग्रह 15 वर्षांपर्यंत कार्यरत राहील. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1