महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 09, 2020
3:26PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विविध क्षेत्रातल्या उद्योजकांशी आर्थिक विकासासंदर्भात चर्चा सुरु

आकाशवाणी

देशातील नामवंत अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या उद्योजकांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या कार्यालयात  आर्थिक विकासासंदर्भात चर्चा करत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह, नीतीन गडकरी, नरेंद्र तोमर आणि पियुष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार तसंच व्ही के सारस्वत, रमेश चंद आणि व्ही के पॉल हे सदस्य आणि प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार  परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय, मंत्रिमंडळ सचिव आणि आणि अर्थ मंत्रालयाचे सचिव देखील उपस्थित आहेत.

व्हेंचर कॅपिटल फंडींग, उत्पादन, प्रवास आणि पर्यटन, तयार कपडे, एफएमसीजी, बांधकाम, डेटा आणि आर्थिक विश्लेषक अशा खाजगी क्षेत्रांसह, कृषी आणि आरोग्य निगा यांसारख्या प्राथमिक क्षेत्रांशी संबधितांचाही बैठकीत सहभाग आहे. तरुण उद्योजकही बैठकीत सहभागी झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था आणि विकास या मुद्यांवर प्रामुख्याने भर दिला जात आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1