छत्तीसगड मधल्याबिजापूर जिल्ह्यातील १९ माओवाद्यांनी काल पोलीसांपुढे शरणागती पत्करली. जिल्हा पोलिस निरीक्षक जितेंद्रकुमार यादव यांनी संगितल की, आत्मसमर्पण केलेल्या या १९ माओवाद्यांवर एकंदर २९ लाखांच बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. या सर्वांना राज्याच्या पुनर्वसन धोरणानुसार प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, छत्तीसगडच्या कोंडागांव जिल्ह्यातही एका माओवाद्याने काल आत्मसमर्पण केल, त्याच्यावर १ लाख रुपयांच बक्षिस जाहीर करण्यात आल होत. तसच दंतेवाडा जिल्ह्यात मालेवाही भागात काल CRPFच्या जवानांच्या पथकाने शोधमोहिमेदरम्यान ५ किलो स्फोटके जप्त केली आणि तत्काळ नष्ट केली.
Site Admin | March 18, 2025 10:26 AM | Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये १९ माओवादी शरण
