महत्वाच्या घडामोडी
भारत जागतिक समस्यांचं उत्तर बनत असल्याचं राष्ट्रपतीचे अभिभाषणात प्रतिपादन            चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा            केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार            महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद - मुख्यमंत्री            शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सांगता           

Nov 26, 2022
7:55PM

ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रमांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

PMO INDIA
संविधान दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. भारतीय राज्यघटना खुली, भविष्यवादी आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिध्द आहे. तिचा आत्मा युवाकेंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.  ते आज संविधान दिनानिमित्त नवी दिल्ली इथं सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राज्यघटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तरुणांनी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोदी यांनी केलं. देशातील सर्वांसाठी न्यायसुलभता सुनिश्चित करण्यासाठी न्यायपालिका ई-इनिशिएटिव्हसह अनेक पावलं उचलत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केलं.

मोदी पुढे म्हणाले की, आजच्या जागतिक परिस्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत आणि वेगाने होत असलेल्या विकासादरम्यान देशाची जागतिक प्रतिमा मजबूत होत आहे. भारत एका आठवड्याच्या कालावधीत G२० चं अध्यक्षपद स्वीकारेल आणि लोकशाहीची जननी म्हणून देशाची प्रतिमा मजबूत होईल याची खात्री करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.  या प्रसंगी त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्र्यांनी ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रमांचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प याचिकाकर्ते, वकील आणि न्यायपालिका यांना माहिती आणि तंत्रज्ञानाद्वारे सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं.


   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1