A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jan 31 2023 8:12PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारत जागतिक समस्यांचं उत्तर बनत असल्याचं राष्ट्रपतीचे अभिभाषणात प्रतिपादन
          
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा
          
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार
          
महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद - मुख्यमंत्री
          
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सांगता
          
Nov 26, 2022
,
8:00PM
२६/११ दहशतवादी हल्ल्याच्या १४ व्या स्मृतिदिनी देशाची शहिदांना आदरांजली
@DrSJaishankar
देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईवरच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना सामोरे गेलेले आणि प्राण गमावलेले पोलीस, सुरक्षा रक्षक आणि निरपराध नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांचं देश कृतज्ञतेनं स्मरण करत आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आपलं कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना देश आदरांजली वाहत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही २६/११ च्या हल्ल्यात जीव गमावलेल्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाला २६/११ च्या हल्ल्याचं विस्मरण झालेलं नाही, आणि ते कधीही विस्मृतीत जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस, सुरक्षा दलाचे अधिकारी आणि नागरिकांना माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आदरांजली वाहिली आहे. राष्ट्र नेहमीच या शूरवीरांच्या त्याग आणि बलिदानाचं स्मरण करेल, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पोलीस आयुक्तालयातल्या शहीद पोलिसांच्या स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केलं. कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ आणि 'बिगुलर लास्ट पोस्ट' ही भावपूर्ण धून वाजवून हुतात्म्यांना सलामी दिली. त्यानंतर राज्यपालांनी तेथे उपस्थित हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.
२६/११ हा देशाच्या इतिहासातला काळा दिवस असून मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणांची पर्वा न करता अनेक निष्पाप नागरिकांचे जीव वाचवताना बलिदान दिलेले सर्व वीर शहीद पोलीस, जवान तसंच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
दहशतवाद्यांशी सामना करताना जखमी झालेल्या पोलिसांच्या सन्मानार्थ मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ असलेलं, प्रतिष्ठित ताज हॉटेल हे दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणांपैकी एक होतं. राज्यातही आज विविध ठिकाणी कार्यक्रम होत असून पाकिस्तानी दहशतवाद्यांशी शौर्यानं मुकाबला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी सांगलीपासून मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरच्या शहीद तुकाराम ओंबळे स्मारकापर्यंत दौड आयोजित करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1